आरोग्य म्हणजे काय ? तर जिथे रोग नाही ते आरोग्य ही सरळ सरळ वाटणारी व्याख्या जारी असली तरी आजच्या आधुनिक युगात आपण ज्या पद्धतीने जीवन जगत आहोत ते बघता प्रत्येकाने आपले आरोग्य टिकवून तसेच ठराविक कालावधी नंतर तपासून बघणे सुध्धा गरजेची आहे. असे का ? कारण कुठलीही व्याधी ही शरीरात प्रवेश केल्यानंतर लगेच परिणाम दाखवत नाही. पण त्या व्याधीची चाहूल मात्र आपल्याला घरघुती टेस्ट नुसार जरूर करता येते. आज आपण दर वर्षी बाहेर जावून ब्लड टेस्ट करत असलो तरी घरी जर आपल्याला काही छोटी छोटी आधुनिक उपकरणे असतील जसे स्मार्ट वेंईग स्केल , डिजिटल हेल्थ वॉच , डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर इत्यादि. हे आणि यासारखे अनेक छोटी छोटी हेल्थ गँजेट्स आहेत जी आपल्याला आपले वजन , शरीरातील चरबी, रक्तातील साखर , हायपर टेंशन , ऑक्सीजन ची पातळी, स्ट्रेस आणि अश्या अनेक इतर शारीरिक बाबी वरती लक्ष ठेवायला मदत करते ज्या मुळे आपल्याला आपल्या आरोग्य राखायला आणि वाढवायला जशी मदत होते तसेच अनेक आजार टाळायला किंवा ते कंट्रोल मध्ये ठेवला सुध्धा मदत होते.
आरोग्य चे मोजमाप घेताना सगळ्यात आधी नंबर येतो तो एका साध्या टेप चा. एक साधा लांबी मोजायचा टेप हा सुध्धा आरोग्य चे मोजमाप घेताना कामाला येतो. कारण टेप नसला तर तुम्ही कुठलेच मापे घेवू शकत नाहीत, रेशो काढू शकत नाही. साधा टेप आणि अचूक वजन यामुळे तुम्ही अनेक रेशो काढून तुमचे आरोग्य कसे आहे याचा प्राथमिक अंदाज काढू शकता . एका बाजूला इंच आणि एका बाजूला सेंटीमीटर दाखवणारा हा टेप आपल्याला फक्त लहान मुलांची ऊंची मोजण्याच्या कमला येतो इतकेच माहिती असते. पण आरोग्याची काळजी घेतांना याच मीटर टेप चा अनेक रेशो मोजण्या साथी उपयोग होतो. जसे BMI , Height to Waist Ratio, Waist To Hips. असे अनेक गुणोत्तर आहेत जी आपल्याला आपल्या आरोग्या बद्दल सतर्क राहायला मदत करतात. कारण आज जारी आपण ठीक वाटत असलो तरी आपल्या शरीराचे बदलत जाणारे मापे आपल्याला जाणवत असतात. परंतु किती इंच कंबर चांगली , किती सुटलेले पोट ठिके , आणि मानेचा घेर किती असे अनेक गुणोत्तरे आपल्याला काढून सध्या टेप ने सुध्धा आपण किती अरोग्यदायी जीवनशैली जगत आहोत हे तपासता येते . या रेशो मुळे सुध्दा आपले आरोग्य किती चांगले आहे हे तपासता येते.
आणि सगळ्यात सोपी टेप वापरण्याची पद्धधात म्हणजे तुमच्या छातीचा घेर मोजणे. यासाठी श्वास सोडून छातीचा घेर मोजावा आणि नंतर प्रत पूर्ण छातीत श्वास भरून छातीचा घेर मोजावा. यात 2 इंचाचा फरक पडला म्हणजे तुमचे फुफ्फुसचे आणि छातीच्या स्नायू चे आरोगी चांगले आहे असे समजता येवू शकते.
1) BMI :- Body Mass Index यामध्ये आपल्या ऊंची आणि वजन चे गुणोत्तर काढून आपला BMI किती हे तपासता येते. त्यामुळे तुम्ही कमी वजन असणारे आहात का नॉर्मल वजनाचे आहात किंवा तुमचे वजन हे जरूरी पेक्षा जास्त आहे हे जाणून घेता येते. तसेच या BMI नुसार आपल्याला कुठल्या हेल्थ रिस्क आहेत हे सुध्धा बघता येते. BMI चे लिमिटेशन हे आहेत की तुमचे वजणा मध्ये चरबी किती आणि मसल किती याचे वेगवेगळे प्रमाण BMI सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कंबर आणि ऊंची याचा रेशो बघवा लागतो. जर तुमचं BMI हा जास्त असेल तर तुम्ही पुढील रेशो मधून शरीरात किती % चरबी आहे हे लशात घेवू शकता.
हेल्दि व्यक्तीचा BMI हा 18.5 ते 24.5 असा असतो .
हा रेशो बघण्यासाठी येथे क्लिक करा.
2) Waist To Height Ratio :- या मुळे तुमच्या पोटावर किती चरबी आहे याचे माप घेता येते. ऊंची च्या मनाने जर पोटाची चरबी जास्त असेल तर त्यमुळे होणारे संभाव्य धोके आपण लक्षात घेवू शकतो. हा रेशो बघण्यासाठी येथे क्लिक करा. हा रेशो जेआर 0.5 पेक्षा कमी असल्यास तुमची पोटावरील चरबी ही जास्त नाही असे समजता येईल .
3 ) Body Fat Calculator :- या रेशोसाठी आपल्याला ऑनलाइन वेबसाइट ची मदत घ्यावी लागते. यामुळे आपल्या शरीरात किती % चरबी आहे याचा अंदाज येतो. हा रेशो बघण्यासाठी येथे क्लिक करा.
याचप्रमाणे इतर अनेक रेशो तुम्ही साध्या टेप आणि तुमचे वजन लक्षात घेवून काढू शकता. यामुळे डायबेटीस , हृदयरोग, वाढलेलेले चरबी आणि त्यामुळे होणारे अनेक धोके जास्त त्रास होण्या आधी लक्षात येवू शकतात. आणि त्यावर उपाय करताना आपण किती प्रगतिपथावर आहोत हे सुध्धा काहीमहिन्यातील रेकॉर्ड वरुण लक्षात येते. त्यानुयसार आहार, व्यायाम तसेच जीवनशैलीत काय बदल करायचे याचा निर्णय घेता येतो.
आरोग्य मोजतना सगळ्यात सोपी आणि प्राथमिक पद्धधात ही वजन मोजण्याची असते. वजनात झालेले चढ उतार हे तुमच्या आरोग्यशी डायरेक्ट निगडीत असतात. त्यामुळे एका ठराविक कलंनंतर जर आपण आपले वजन मोजौन त्याची नोंद ठेवत गेलो तर आरोग्या च्या अनेक समस्या उद्भवण्या आधी आपल्या एक अलर्ट जरीर मिळतो.
आजचे आधुनिक युगात वजन मोजणारे यंत्र हे वजन मोजण्या पलीकडे सुध्धा अनेक हेल्थ parameter आपल्याला दाखवू शकते. यासाठी स्मार्ट स्केल बाजारात उपलब्ध आहेत.
ओम्रोन कंपनीने आणलेली स्मार्ट वेंग स्केल ही वजनपलीकडे BMI , शरीरातील स्केलेटण मास इंडेक्स , रेस्टिंग मेटाबोलीझ्म , व्हीसेरल fat याचे सुध्धा प्रमाण दर्शवले जाते. आशा पाध्ध्तीच्या स्केल या online मिळत असून त्या बद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
बाजूच्या इमेज मधील ओम्रोन कंपनीची स्केल बद्दल आणि तिच्या किमती बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .
ब्लड प्रेशर मोजणारे मॉनिटर घरी असणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असते. कारण वाढलेला रक्त दाब हा अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. शरीरातील प्रत्येक पेशी आणि प्रत्येक अवयवला रक्त हे गरजेचं असतच , परंतु नैसर्गिक ठराविक दाबा पेक्षा जास्त दाबाने रक्त पुरवठा हा शरीरातील अंतर्गत प्रणाली ला नुकसान पोहोचवतो. अनेक वेळा वाढलेला रक्त दाब हा खूप वाढला की च लक्षात येतो. तोवर शारीरिक हानी ही खूप झालेली असते. आशा ऐवजी जर आपल्या घरीच आपण एक ब्लड प्रेशर मॉनिटर ठेवला ज्याच्यामुळे आपण दर काही महिन्यांनी आपण मोजत राहिलो तर झालेला बदल योग्य वेळी लक्षात येवून लवकर आपण उपचार घेवू शकतो.
शास्त्रीय दृष्ट्या रक्तदाब मोजन्याची एक पद्धधात आहे, जी अनेकांना मीहिती नसते. त्यामुळे दिवसभरत कधीही आपण मशीन चे रीडिंग घेवून झालेला बादल नोट करून ठेवून एखाद्या निर्णयाला पोहोचू शकत नाही. घरी ब्लडप्रेशर मॉनिटर वापरत असताना पुढील प्रमाणे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
रीडिंग घेत असताना चालून आल्यावर, जिना चढल्यावर किंवा उतरल्यावर लगेच घेवू नये. किमान अर्धा तास रेस्ट घेवून मगच रीडिंग घ्यावे.
एकाच रीडिंग वर विस्मबून राहू नये. एकाच वेळेस किमान 3 रीडिंग घेवून त्यांचे सरासरी लक्षात घ्यावी.
त्याचप्रमाणे दिवसा आणि रात्री दोन वेळेस किमान रीडिंग घावे. कारण दिवसा कमी असलेला रक्त दाब रात्री वाढत असेल, किंवा रात्री असलेला रक्तदाब हा सकाळी तेवढाच रहात असेल तर काही वेळा डॉक्टर च्या सल्या ची गरज असू शकते.
रीडिंग घेताना पाठीवर झोपून हात सरळ ठेवून रीडिंग घ्यावे, बसलेल्या किंवा एका कुशीवर झोपून रीडिंग घेवू नये.
बीपी कफ हा डाव्या हाताला दंडाला कोपर्याच्या वरती त्याची ट्यूब दंडच्या वरती आणि मनगटा च्या बाजूला खाली येईल असे बांधावे. या मुळे त्या ट्यूब वरती कुठलाही इतर शरीरिक दाब येत नाही.
रात्री जेवणं नंतर झोपेच्या आधी ब्लड प्रेशर मोजावे, तसेच सकाळी उतयल्यानंतर चहा सुध्धा न पिता ब्लड प्रेशर मोजावे. आणि आपल्या डॉक्टरांना हे रीडिंग वर्षातून किमान 2 वेळा दाखवावे. तसेच त्यांच्या OPD मध्ये सुध्धा ब्लड प्रेशर रीडिंग घ्यावे.
ब्लड प्रेशर बद्दल घेतलेली खबरदारी हे जीवनात अनेक आजारांना सुरवात होण्यापासून रोखू शकते . त्यामुळे आरोग्य राखताना ब्लड रेशर मॉनिटर हा आपल्या घरी जरूर असा डिव्हाईस आहे. तुम्ही जवळच्या मेडिकल मधून अथवा ऑनलाइन हे खरीदी करू शकता.
ब्लड प्रेशर मॉनिटर च्या ऑनलाइन किमती जाणून घेण्या साथी येथे क्लिक करा.
रक्तदाबा प्रमाणेच रक्तातील साखर हा सुध्धा अजजर होण्या आधी लक्षातघेण्याचा विषय असतो. भारत हा जसा आर्थिक प्रगति करीत आहे त्याच वेळेस आरोग्या च्या बाबतीत उदासिनता वाढत चाललेली आहे. जगातील एकूण डायबेटीस च्या रुग्णांमध्ये भारताचा वाटा मोठा आहे. आणि दर वर्षी तो आकडा वाढतच आहे. आपली बदललेली जीवनशैली आणि आहार ची पद्धती मुले आपल्या शरीरातील शुगर ही वाढत जात आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे त्याबद्दल जागरूकता नाही. शरीरात साखर वाढते म्हणजे आपण खाललेली साखर शरीरात वापरली जात नाही. आणि साठून राहिलेली साखर ही टाइप 2 चे डायबेटीस ला करणीभूत होते. हे टाइप 2 चे डायबेटीस अनेक वेळा इतर कारणाने जेंव्हा पेशंट डॉ कडे तपासाला जातात त्या वेळेस लक्षात येते. परंतु तोवर बर्याचवेळा ही लेवल खूप वाढलेली तरी असते किंवा कमी तरी झालेली असते.
शरीरात साठलेली साखर ही रक्तवाहिन्या कडक करते, अंतर्गत सर्व अवयवांना हानी पोहोचवते जसे किडनी , डोळे ,लिव्हर, हाडे . रक्तवाहिन्या कठीण झाल्या मुले रक्तदाब वाढतो . आणि शरीरातिल हार्मोन चे सुध्धा संतुलन बिघडते. शुगर असणार्या पेशंट ना इतर काही आजार किंवा ओपेरशन कारचे झाल्यास त्यासाठी वेगळी खबरदारी ही घ्यावी लागत असते. त्यामुळे डायबेटीस होण्या आधी जर तुम्ही तुमची ग्लुकोज लेवल नियमित तपासात असाल तरच वाढलेली शुगर तुम्हाला वेळीच लक्षात येवू शकते.
ग्लुकोज तपासताना शक्यतो एक टेस्ट ही सकाळी झोपेतून जागे झाल्यावर लगेच घ्यावी , आणि रात्रीच्या जीवन आणि टेस्ट या मध्ये किमान 8-9 तासाचे अंतर असावे. तसेच जेवण झाल्यावर दुपारी 2 तासानंतर सुध्धा टेस्ट घेवून हे रीडिंग नोट करून ठेवावे. सकाळची टेस्ट जर 99 पेक्षा कमी रीडिंग दाखवत असेल तर त्याला नॉर्मल समजले जाते, पण ही लेवल 70 पेक्षा कमी असू नये. तसेच इतर वेळेस टेस्ट केल्यावर हीच लेवल 120 च्या खाली असावी जर या एकषा जास्त लेवल येत असेल तर डॉ चा सल्ला जरूर घ्यावा.
ऑनलाइन ग्लुको मीटर च्या किमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
डिजिटल स्मार्ट वॉच
आधुनिक युगातील स्मार्ट वॉच हे आपल्याला आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास खूप मदत करतात. त्यामुळे आपण रोज किती चालतो , हृदयची गती किती , शरीरातील स्ट्रेस लेवल किती यावर आपले लक्ष राहते. आणि आपण किमान आपले हेल्थ कसे आहे यावर कमी वेळात आणि नियमित लक्ष्य ठेवू शकतो.
वेगवेगळ्या स्मार्ट वॉच च्या किमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.