उच्चरक्तदाब नियंत्रण करण्यासाठी दहा सोपे उपाय .
उच्चरक्तदाब नियंत्रण करण्यासाठी दहा सोपे उपाय .
रक्तदाब याला सायलेंट किलर म्हणून ओळखतात. कारण रक्तदाबवरती नियंत्रण न मिळवल्यास किंवा वेळेवर उपचार न केल्यास त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होवू शकतात. WHO ( वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन ) च्या अहवाला नुसार देशातील 30% जनता ही रक्तदाब आणि उच्च् रक्तदाब च्या समस्येने पीडित आहेत.
120/80 ही सामान्य रक्तदाबची पातळी आहे. परंतु त्यापेक्षाजस्त रक्तदाब असणे म्हणजे तुम्हाला रक्तदाबची समस्या आहे असे म्हणता येईल. परंतु हीच रक्तदाबची पातळी जर 140/90 पेक्षाही जास्त वाढत असेल तर त्याला हायपर टेंशन असे म्हणतात . सतत हौपर टेंशन मध्ये असल्यास, आणि योग्य वेळी उपचार न केल्यास हायपर टेंशन मुळे हृदय , किडनी, यांना नुकसान होवू शकते. तसेच यामुळे हृदय रोग, स्ट्रोक , किडनी फेल होणे अश्या समस्या सुध्धा पुढे जावून उद्भवू शकतात.
या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत असे सोपे बदल सुचवत आहोत ज्या मुळे तुम्हाला हायपर टेंशन किंवा तुमचं वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
1) वजन कमी करणे तसेच कमरेचा घेर कमी करणे.
जर तुमचे वजन वाढलेले असेल तर त्यामुळे रक्तदाब वाढतोच. कारण रक्त वाहिन्यांवरती अतिरिक्त वजनाचा दबाव आल्याने शरीराच्या सर्व भागाला रक्त पुरवण्यासाठी हृदयाला जास्त दाबणे रक्त पंप करावे लागते. त्यामुळे जर तुमचे वजन योग्य नसेल तर ते कमी करून तुम्ही रक्तदाबाच्या समस्ये वरती थोडा अंकुश ठेवू शकता. योग्य वजन म्हणजे तुमचे वजन आणि ऊंची याचा भागकार करून आलेले उत्तर हे 20-22 असल्यास तुमचे वजन अगदी योग्य आहे पण तेच उत्तर हे 23 पासून पुढे जात असेल टीआर तुम्हाला तुमचे वजन कमी करण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमके वजन हे 1 kg ने कमी केलेत तर तुमचा रक्तदाब हा 1mm / Hg ने कमी होवू शकतो. त्या नुसार जर तुम्हाला हापर टेंशन असेल टीआर कमीत कमी 10 किलो वजन तरी तुमचे कमी असले पाहिजे.
तसेच जर तुमच्या कंब रेचा घेर हा 40 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यामुळे सुध्धा तुमचे वजन वधू शकते, कारण जास्त कंबरेचा घेर म्हणजे जास्त वजन. त्यामुळे पुरुषांचा कंबरेचा घेर हा 40 इनचा पेक्षा कमी हवा तसेच स्त्रियांचं 35 पेक्षा कमी हवा. जर तुमचे माप यापेक्षा जास्त असेल तर ते योग्य व्यायाम करून तुम्ही नियंत्रणात ठेवून रक्तदाब कमी करू शकता.
2) नियमित व्यायाम
रक्तदाब असो किंवा नसो रोज व्यायाम केल्यास तुमचे आरोग्य हे चांगले राहू शकते. परंतु ज्यांना रक्तदाब आहे त्यांनी रोज न चुकता 30 मिनिटे व्यायाम करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. कारण 1किलो वजन कमी केल्यास तुमचा रक्तदाब हा 1 ने कमी होतो पण रोज व्यायाम केल्यास तुमचा रक्तदाब हा 5 ते 8 mm /Hg ने कमी होतो.
त्यामुळे जर तुम्हाला उच्च रक्तदाब ( हापर टेंशन ) असेल तर रोज व्यायाम करून त्याचे रूपांतर हे वाढलेल्या रक्तदाबा कडे होवू शकते.
3) मिठाचे सेवन कमी करणे.
मीठा मध्ये सोडियम असते, सोडियम मुळे शरीरात पाणी साठून राहते. त्यामुळे वजन वाढायला लागते. म्हणून मीठ हे प्रमाणात जेवण्यात घेतल्यास रक्तदाब हा नियंत्रणात राहतो. अतिरिक्त मीठ जेवणात न घेतल्यास 5-8 mm /Hg ने रक्तदाब हा कमी होवू शकतो.
4) दारू चे सेवन न केल्यास किंवा कमी करणे
दारू ही शरीराला हनिकरक्च आहे. पररानतू काही लोकांचे व्यसन जर सुटतनसेल तर त्यांनी दारू कमी पीलयास त्यांचा राक्त्स्दाब हा कमी होण्यास मदत मिळते. दारू पिणे कमी करून सुध्धा तुमचं रक्तदाब हा 4-5 mm/hg ने कमी होवू शकतो.
5) धूम्रपान न करणे
धूम्रपान ( स्मोकिंग ) मुळे रक्तवाहिन्या कथून होतात. त्यमुळे रक्तदाब वाढतो. म्हणून स्मोकिंग न केल्यास किंवा सोडून दिल्यास रक्तदाब कमी झाल्याचा दिसून येईल.
6) शांत झोप घेणे
रोज प्रत्येक व्यक्तिला 8 तासाची झोप गरजेची असते. एनआयटी झोप न झाल्यास स्लिप अप्निया चा धोका वाढतो. स्लिप अप्निया मुळे वजन वाढते आणि शरीरचा थकवा कमी न झाल्याने रकदाब वाढतो.
( स्लिप अप्निया च्या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी येथे click करा )
7) आहार
असा आहार ज्यात fat कमी असेल तसेच जास्त तळलेले पदार्थ टाळणे, तसेच आहारात कडधान्ये , भाजी, फळे याचा समावेश केल्यास वजन नियंत्रित राहते, शरीरात चरबी जमा होत नाही, आणि रक्तदाब सुध्धा नियंत्रणात राहतो.
8) तनाव कमी करणे
अकारण चिंता करत राहणे यामुळे सुध्धा रक्तदाब वाढतो. त्यामुळे कुटल्याही परिस्थिति चा अति विचार करणे टाळल्यास तान येत नाही. तसेच योगा , मेडिटेशन यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ताण कमी केल्यास तुम्हाला रक्तदाब कमी होण्यास मदत होवू शकते.
9) नियमित घरी रक्तदाब मोजणे
घरी नियमित रक्तदाब मोजल्यास वाढलेला रक्तदाब लवकर लक्षात येतो. त्यमुळे त्यामुसार जीवन शैली, आहार, तसेच औषध घेवून रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. म्हणून वरच्यावर घरी रक्तदाब बघणे हे फायदेशीर ठरते.
( रक्तदाब घरी मोजण्यासाठी चांगले उपकरना विषयी येथे Click करा )
10) कुटुंबाची , मित्रांची सहायता
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तुमचे कुटुंब तुमचे मित्र हे तुम्हाला प्रोःत्साहित कर्त असतात, कारण याच्या पैकी कुणालाही तुम्ही आजारी असावे असे वाटत नसते. त्यामुळे तुमच्या रक्त दबा बद्दल घरी चर्चा करा. तो कमी करण्यास तुम्ही काय करू इच्छि त ते सुध्धा सांगा त्यामुळे तुंहला तुमचे आरोग्य चांगले रखण्यास माद्त्च मिळणार आहे.
या शिवाय तुमच्या फॅमिली डॉक्टर चे औषध सुध्धा महत्वाचे आहे. त्यामुळे रोज रक्तदाब नियंत्रित करण्याची गोळी चुकवू नका .