रोज रात्री नीट न येणारी झोप ही तुमच्या वाढलेल्या ब्लड प्रेशर चे कारण असू शकते ! हे तुम्हाला खोटे वाटू शकेल की रोज झोपून कसेकाय ब्लड प्रेशर वाढते ? आजवर आपण सगळ्यांनीच कामाचा तान आहे म्हणून, वय वाढले आहे म्हणून ब्लड प्रेशर वाढलेले ऐकलेच आहे, पण  झोप नीट न झाल्याने सुध्धा आपल्याला ब्लड प्रेशर चा सामना करावा लागू शकतो.  रात्रीच्या झोपेमुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होतो , कारण रात्रभर शरीर झालेली झीज भरून काढत असते. आणि आपल्या इतर शारीरिक क्रिया बंद असतात. पण काही वेळेस अनेक लोक असे अनुभवतात की सकाळी झोपेतून उठल्यावर सुध्धा ताजेतवाने न वाटतं थकल्या सारखेच वाटत असते. परत  थोडी झोप घ्यावी वाटत असते. दिवस भर  डोळ्यावर झोपेची झापड राहते. त्याचबरोबर  थोड्या कारणाने सुध्धा चिडचिड होत असेल तर हे तुमच्या विस्कळीत झालेल्या झोपेचे लक्षण आहे. पण या मुळे ब्लड प्रेशर कासेकाय वाढत  असेल ? असा प्रश्न जरूर तुम्हाला पडलेला असेल. 

जर आशा प्रकारची समस्या तुम्हाला असेल तर याच बरोबर तुम्हाला झोपेत घोरण्याही सवय आहे का? सकाळी झोपेतून जागे झाल्यावर तोंड कोरडे पडते का? रात्री झोपेतून उठून वारंवार युरिणसाठी जावे लागते का? जर यापैकी 2 किंवा 3 ही समस्या तुम्हाला रोज जाणवत असतील तर तुम्हाला स्लिप आपनीय या झोपेच्या आजाराची लागण झालेली असू शकते.