घोरणे : आरोग्यासाठी धोकादायक
घोरणे ही अनेकांना त्रास देणारी समस्या आहे. जरी सुरुवातीला ही समस्या फक्त त्रासदायक वाटत असली तरी, दीर्घकाळ घोरणे हे गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. सर्वात मोठा धोका म्हणजे घोरणेमुळे 'स्लीप अॅपनिआ' हा गंभीर आजार होऊ शकतो.
स्लीप अॅपनिआ काय आहे?
स्लीप अॅपनिआ हा असा आजार आहे ज्यामध्ये झोपेत अनेक वेळा श्वास थांबतो आणि पुन्हा सुरू होतो. झोपेत श्वास थांबल्यामुळे रक्तातील ऑक्सीजन ची पातळी ही कमी होते. आणि त्यामुळे शरीरातील सर्वभागला रक्त जरी [फोचात असले तरी रक्तातून ऑक्सीजन पुरेसा मिळत नाही. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा होतो आणि शरीराच्या विविध अवयवांना त्रास होतो. या मुळेच स्लिप अॅपनिया असणार्या व्यक्तींना सकाळी झोपेतून उठल्यावर परत विषर्न्ती घ्यावी वाटते, किंवा काम करावे वाटत नाही. कारण झोपेत त्यांच्या शरीराला अवशकतेपेक्षा कमी ऑक्सीजन मिळाल्याने शरीराळा विश्रांति मिळत नाही.