अनेक पेशंट ना हॉस्पिटल मधून घरी डिस्चार्ज देताना डॉक्टरांकडून घरी ऑक्सीजन लावण्यास सांगण्यात येतो. अनेक पेशंट नया आणि त्यांच्या नतेवाईकांना असे का सांगितले ही माहिती नसते. अनेकवेळा फक्त हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेण्याची घाई, कमी पैशात सुविधा मिळण्याची अपेक्षा यामुळे योग्य आणि उपयोगी वस्तु त्यांना मिळू शकत नाही. त्या मुळे या लेखात आपण ऑक्सीजन कॉनसेंट्रेटर कुणाला लागू शकते , आणि ते निवडताना कुठले पर्याय शोधावे यावर माहिती घेवू .
ऑक्सीजन ची पेशंट ला असणारी गरज :- ऑक्सीजन ला मराठीत आपण प्राण वायु म्हणतो. कारण ऑक्सीजन शिवाय काहिमीनिटच आपण जगू शकतो. अनेक मोठ्या आजारात नॉर्मल असणारी ऑक्सीजन ची पातळी खूप खालवते. त्यामुळे योग्य उपचारा नंतर सुध्धा काहि दिवस पेशंट ला घरी ऑक्सीजन वापरायला सांगितले जाते. दीर्घकालीन हृदय विकार किंवा फुफ्फुसच्या आजार मुळे , रक्तात पुरेसा ऑक्सीजन मिळत नसतो. या टर्म ला वैद्यकीय भाषेत हायपोक्सिया असे म्हणतात. समान्यता या आजारांमध्ये सी. ओ. पी. डी. पल्मनेरी फेब्रोसिस , दमा आशा अजरांचा सुध्धा समावेश असतो.
COPD ( Chronic Obstructive Pulmonary Desis ) :- COPD पेशंट ना क्रोणीक ( म्हणजे खूप काळा पासून ) हायपोक्सीमिया असतो . हायपोक्सीमिया म्हणजे रक्तातील ऑक्सीजन ची पातळी खालवलेली असणे . तीमुळे हृदयावर आणि फुफ्फुसावर ऑक्सीजन ची पातळी मेंटेन ठेवणीसाठी अतिरिक्त तान येत असतो . copd मुळे फुफ्फुसतील वायुकोशीक ( alovli ) खराब झालेल्या असतात, फुफ्फुसला सूज असते त्यामुळे रक्तात पुरेशा प्रमणात ऑक्सीजन मिसळत नाही. यामुळे शरीरातील महत्वाच्या अवयवांना ऑक्सीजन ची कमतरता जाणवते.
त्यामुळे COPD पेशंट ना Long-term oxygen therapy (LTOT) म्हणजे जास्त काळ ऑक्सीजन चा अतिरिक्त पुरवठा दिल जातो. यामुळे पेशंट ना येणारा थकवा कमी होतो. तसेच हृदयावर येणार तान सुध्धा कमी होतो.
Pulmonary Fibrosis & Interstitial Lung Diseases :- पल्मनरी फेब्रोसिस म्हणजे फुफ्फुसच्या गॅस एक्स्चेंज करणाऱ्या पेशी कोशीका कडक होणे. या मुळे फुफ्फुसातून रक्तात ऑक्सीजन मिसळला जाऊ शकत नाही. आणि यामुळे हायपॉक्सीमिया होतो. त्यामुळे पल्मनरी फेब्रोसिस असणाऱ्या पेशंटना सुध्धा अतिरिकात ऑक्सीजन वापरण्याचा सल्ला दिला जातो.
Low Pulse Oximetry: पल्स ऑक्सीमीटर हे रक्तातील ऑक्सीजन ची पातळी दाखवत असते. नॉर्मल व्यक्तीची रक्तातील पातळी ही 95 ते 99 % इतकी असते. परंतु जेंव्हा एखाद्या पेशंट ची रक्तातील ऑक्सीजन ची पातळी ही 90% पेक्षा खाली जाते तेंव्हा त्या व्यक्तीला अतिरिक्त म ऑक्सीजन वापरण्याचा सल्ला दिला जातो.
Heart Failure: कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, ज्यामध्ये हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त पंप करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आशा वेळेस सुध्धा अतिरिक्त ऑक्सीजन चा सल्ला दिला जातो.
या सगळ्या प्रमाणेच अस्थमा , पल्मनरी हायपर टेंशन , स्लिप अपणेया , लंग कॅन्सर, इतर श्वसन विकार यांमध्ये सुध्धा ऑक्सीजन कॉन्सेट्रेटोर वापरण्याचा सल्ला दिला जातो.
ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर हे 5 आणि 10 लिटर चा ऑप्शन मध्ये मिळते. हे मशीन हवेतून ऑक्सीजन काढून पेशंट ना श्वासनांसाठी देत असते. आपल्याला योग्य मशीन मिळवणीसाठी जर आपण विकत/ रेंट ने घेणार असू तर पुढील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे
1) मिळणारे ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर हे नियमित सर्विस केलेले आहे का ?
2) ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर किती तास चाललेले आहे ? 3000 तासा पेक्षा जास्त किंवा 5 वर्षा पेक्षा जास्त जून ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर रेंट ने घेवू नये, कारण त्यातून मिळणारा ऑक्सीजन हा कमी प्रमाणात असू शकतो.
3) ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर चे फिल्टर नियमित बादलेले आहेत का ? तसेच ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर घेताना , ते फिल्टर साफ केलेले आहेत का? हे जरूर तपासवे . साधारणता 1200 तास ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर वापरल्यावर त्यातील air filter हे बदलणे आवश्यक असते. तसेच घरी वापरताना ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर चे air filter हे दर 8 दिवसांनी स्वच्छ करणे गरजेचे असते. नाहीतर त्यात हवेतील धूळ साठून मिळणार ऑक्सीजन कमी मिळू शकतो.
4) जर तुम्ही नवीन ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर घेत असाल तर त्याच्या किमती बरोबरच नंतर मिळणारी सर्विस सुध्धा लक्षात घ्यावी लागते.
5)साधारण चांगल्या ब्रॅंड चे ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर हे 1 वर्षाच्या वारांटी सोबत येतात, परंतु काही कंपन्या या 3 वर्षं सुध्धा वारंटी देत असल्या तरी त्या कंपनीचा तुमच्या शहरात सर्विस सेंटर नसल्यास तुम्हालाच इतर शहरात जावून warranty मध्ये सर्विस घ्यावी लागते. त्यामुळे ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर विकत घेताना विक्रेता हा त्या कंपनीचा अधिकृत आहे का याची खात्री करून घ्या.
6) काही कंपन्यांचे ऑक्सीजन कॉनसेनट्रेटर हे खूप कमी किमती मध्ये उपलब्ध होते परंतु किमती पेक्षा रुग्णाच्या दृष्टिकोनातून त्या मशीन मधून एनर ऑक्सीजन ची पातळी ही मत्वाची असते. जर तुम्ही स्वस्त मशीन घेतले टर त्यातील ऑक्सीजन तयार करणारे ziolite हे लवकर खराब होऊन तुम्हाला दुसरे मशीन विकत घ्यावे लागू शकते. तीमुळे घेताना विक्रेता ते मशीन किती वर्षांपासून विकत आहे, ग्राहकांकडून त्याचे के रिमार्क , कम्पलेनट आलेल्या आहेत याची चौकशी करा. कदाचित आज तुमचे काही पैसे वाचतील परंतु त्यामुळे भविष्यात अधिक खर्च होऊ शकतो.
अहिल्यानगर मध्ये ज्या पेशंट ना घरी ऑक्सीजन ची गरज असेल त्या पेशंटसाठी zen Medical Equipment कडून प्रोफेशनल सर्विस दिली जाते. वेळोवेळी सर्विस आणि कॅलिब्रेशन केलेले ऑक्सीजन concentrator हे रेंट वर तसेच उत्तम प्रतीचे फिलिप्स कंपनीचे Oxygen Concentrator हे विक्री आणि विक्री पश्चात सेवेसाठी उपलब्ध आहेत.
पुढील लिंक वर जावून तुम्ही आमचे लोकेशन गूगल मॅप वर शोधू शकता.
Written By,
Shripad Puntambekar,
Philips Sleep Savior & Member of ISSR
Disclaimer :- This article is only for information regarding topic, for any medical condition please reffer to doctor.